बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

का म्हणू मी चंद्र तूला 
पटत  नाही मनी मला
तो तर कलेकलेने  बदलतो   रूप 
तुझासमोर सखे  आहे तो हि कुरूप
 
सूर्याची उपमा तूला काय देवू 
तूलना करून   तूला नाव का ठेवू 
प्रखर असा तो सुंदर  त्याचे  तेज
तुझासमोर मात्र तो हि निस्तेज 
 
 लोक प्रेमाला  सागर म्हणे 
तूला असे म्हणून का करू उणे 
चंद्र करी लोकांसाठी भरती ओहोटी 
पण तू तर माझी आहे अन माझीच होती

 
तू प्रिये आहेस  सगळ्यात वेगळी  
आयुष्यात फक्त माझासाठीच  जगली  
जशी आहे तू तशीच वागली 
म्हणूनच तूझी   मनाला सवय हि जडली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा